जळगाव- बजाज फायनान्समधून अधिकारी बोलत असल्याचे सांगून बजाज फायनान्सचे लोन मिळवूण देण्याचे आमिष देत सय्यद अलीम सय्यद शौकत पटवे वय 34 रा. यशवंतनगर भडगाव यांना 1 लाख 75 हजार रुपयांत ऑनलाईन गंडा घातल्याची घटना घडली होती. भडगाव पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्यात जळगाव सायबर पोलिसांनी भिवंडी येथील येथून दोन भामट्यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची 1 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
19 जानेवारी ते 06 फेब्रुवारी दरम्यान वेगवेगळ्या व्यक्तींनी सय्यद अलीम सय्यद शौकत पटवे, वय 34, रा.यशवंतनगर भडगाव जि,जळगाव याच्याशी बजाज फायनान्स मधुन अधिकारी बोलत असल्याचे सांगुन वेगवेगळ्या कारणांसाठी फिर्यादीकडून 1 लाख 75 हजार रुपये ऑनलाईन स्विकारले होते. प्रत्यक्षात कुठलेही दोन दिल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर पटवे यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांच्या पथकाने गुन्ह्यातील आरोपींना बनावट नावाने सिमकार्ड चालु करुन मदत करणारे दोन आरोपी 1) शफिक मिरासाहेब शेख, वय-25, आबीद हारुण खान, वय-27, दोन्ही रा.भिवंडी याना अटक करण्यात केली.