जिल्हा रुग्णालयातील कोरोना योद्धांचा सत्कार
नंदुरबार। येथील बडगुजर समाज उन्नती मंडळ तसेच बडगुजर समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक वाचनालय सभागृहात रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबिरात सुमारे 25 दात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. तसेच कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना सेवा देणार्या कोरोना योद्धांचाही बडगुजर समाजातर्फे गौरव करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया कमी प्रमाणात होत होत्या. परंतु कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने रुग्णालयात शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे. तसेच शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गरजूंना संकटसमयी रक्त पुरवठा व्हावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून बडगुजर समाजातर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष विजय बडगुजर, उपाध्यक्ष रवींद्र बडगुजर, सचिव अश्विन बडगुजर, खजिनदार देविदास बडगुजर, सल्लागार पंडीत बडगुजर, सदस्य दिलीप बडगुजर, गणेश बडगुजर, भरत कोतवाल, प्रकाश बडगुजर, विलास बडगुजर, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनिता बडगुजर, उपाध्यक्षा पौर्णिमा बडगुजर, सचिव रेणुका बडगुजर, सदस्या अनिता बडगुजर आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जिल्हा रुग्णालयाचे खताळे, जयेश सोनवणे, महेंद्र चव्हाण, रोहित चव्हाण, ईश्वर वसावे, अहमद पिंजारी आदींनी परिश्रम घेतले.