शिंदखेडा। शिंदखेडा तालुका बडगुजर समाज जागृती मंडळ व अखिल भारतीय बडगुजर समाज युवा समितीच्या संयुक्त विद्यमाने शिंदखेडा तालुक्यातील बडगुजर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम येथील बिजासनी मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिंदखेडा तालुका बडगुजर समाज मंडळाचे उपाध्यक्ष संतोष बडगुजर हे होते. यावेळे एकूण 72 गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा.बडगुजर महासमितीचे अध्यक्ष उमेश करोडपती, महासचिव भालचंद्र बडगुजर, माजी अध्यक्ष आनंदा सूर्यवंशी, हिरालाल दोडे, सुरेश बडगुजर, सुधीर बडगुजर, अशोक बडगुजर, अ.भा.युवा महासमितीचे अध्यक्ष दिलीप बडगुजर, मनोहर बडगुजर, रवींद्र बडगुजर, सुनंदा बडगुजर, मंगला करोडपती, माधव बडगुजी, प्रणव बडगुजर, शिंदखेडा शहराध्यक्ष दिलीप बडगुजर, गोपाळ बडगुजर, प्रकाश बडगुजर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुपडू बडगुजर, दिलीप बडगुजर यांनी तर सूत्रसंचलन प्रा.ईश्वर बडगुजर, प्रा.एच.आर.बडगुजर यांनी केले. आभार अशोक गिरनार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिंदखेडा शहर बडगुजर समाज मंडळ, अखिल भारतीय युवा समिती, शिंदखेडा तालुका बडगुजर समाज जागृती मंडळाच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.