जळगाव । वधु-वर परीचय मेळावा हा योग्य असून याचा फायदा प्रत्येक समाज बांधवांनी घेतला पाहिजे. आज प्रत्येक समाजातील मुलींना नोकरी करणारा मुलगा हवा असतो. अशा परिस्थितीत मुलीचे वय वाढल्याने पालकांना अधिक त्रास होतो. त्यामुळे मुलीचे लग्न वयातच झाले पाहिजे. तसेच शेतकरी मुलगा सुद्धा तुम्हाला सुखी ठेवू शकतो, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी उपस्थित पालकांना आणि मुलं मुलींना उद्देशून सांगितले. जळगाव जिल्हा बडगुजर समाज विकास संस्था व बडगुजर विद्या प्रसारक मंडळातर्फे वधू-वर परिचय मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजूमामा भोळे, महापौर ललित कोल्हे यांची उपस्थिती होती. दरम्यान खासदार ए.टी.नाना पाटील यांनी धावती भेट देऊन शुभेच्छा दिल्यात. त्यानंतर समाज बांधवांतर्फे विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
वधु-वर पुस्तिका प्रकाशन
शहरातील मानराज पार्कजवळील मुंदडा हायस्कूलमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यक्रम उत्साहात पार पडला. जळगाव जिल्हा समाजा विकास संस्था व बडगुजर विद्याप्रसारक मंडळ यांच्याद्वारे आयोजित केलेल्या भव्य वधू-वर मेळाव्या वधु वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन पुण्यातील उद्योजक रविंद्र त्र्यंबक बडगुजर यांच्याहस्ते करण्यात आले.
300 मुला मुलांनी दिला परिचय
यावेळी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात राज्यात वसलेल्या समाज बांधवांची उपस्थिती दिला. वधु-वर परीचय मेळाव्यात 300 हुन अधिक मुला व मुलींनी आपापला परिचय दिला. यावेळी तीन्ही राज्यातून आलेल्या समाज बांधवाना भोजन व नास्ताच्या सुविधा आयोजकांकडून करण्यात आले होते. तर या कार्यक्रमाला 4500 हून अधिका समाज बांधवानी हजर राहून एकमेकांशी संवाद साधला.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारोळा बालाजी विद्या प्रबोधनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उमेश करोडपती, तर उद्घाटक नाशिक येथील नगरसेवक तथा मनपा माजी विरोधीपक्ष गटनेता सुधाकर बडगुजर, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नथ्थु बडगुजर (बोराडी), आनंदा सूर्रवंशी (धुळे), सुरेश बडगुजर (चोपडा), रंगराव बडगुजर (अध्यक्ष, अ.भा.ब.स.वधूवर परिचर मेळावा, जळगाव), सुधाकर बडगुजर (बडगुजर विद्याप्रसारक मंडळ, जळगाव), मोहन बडगुजर (मुंबई), सतीष बडगुजर (मुंबई), हिरालाल दोडे (बुर्हाणपुर, म.प्र.), विक्रम बडगुजर (अहमदाबाद), मुरलीधर पाटील (सुरत), सुरेश महाजन (भुसावळ), भावना बडगुजर (औरंगाबाद), लखनसिंग केलकर (कालमुखी, म.प्र.)