मुंबई : महानायक अमिताभ बच्चन सध्या नागपूरमध्ये ‘झुंड’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं अमिताभ गावातील जीवनशैलीचा आनंद लुटत आहेत.
‘बड़े दिनों के बाद गाँव की खटिया का आनंद लूटा ; और बैल गाड़ी की सवारी का’ असं लिहित अमिताभ यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केला आहे. तर दुसरीकडे चित्रपटासाठी त्यांनी बसमधूनही प्रवास केला. हा प्रवास करताना मला माझ्या महाविद्यालयीन दिवसांची आणि उमेदीच्या काळाची आठवण झाली. त्यावेळी असंच मी ट्राम किंवा बसनं प्रवास करायचो असं म्हणत त्यांनी आठवणी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केल्या.