बडोदा बँकेकडून आश्रम शाळेस क्रीडा साहित्य भेट

0

शिरगाव- येथील शारदाश्रम आश्रम शाळेस तळेगाव येथील बँक ऑफ बडोदातर्फे खेळाचे साहित्य देण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक विजय लोखंडे यांनी दिली. यावेळी शाळेचे कर्मचारी व बँकेचे व्यवस्थापक शिवभूषण यादव, जितेंद्र हरदास, राकेश जावेद, अनिल यादव,निजाम शेख आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवभूषण यादव म्हणाले की, यावर्षी शाळेचा 111 वा स्थापना दिवस असल्याने आणि आपणही काही समाजाचे देणे लागतो. या भावनेतून आम्ही काही पैसे गोळा करून हे क्रीडा साहित्य या शाळेस दिले आहे. याचा जर या मुलांना फायदा झाला तर तर कोण जाने उद्याचा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू याच मुलामध्ये दडला असेल. यावेळी मुख्याध्यापक विजय लोखंडे, हनुमान सुरणार, संतोष चव्हाण, राधेश्याम वारे, मच्छींद्र कापरे आणि उपस्थित होते.