शिरगाव । तळेगाव येथील बँक ऑफ बडोदा तर्फे शिरगावच्या शारदाश्रम आश्रम शाळेत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांसाठी बँकेच्या वेगवेगळ्या योजनांची माहितीही यावेळी सांगण्यात आली अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक विजय लोखंडे यांनी दिली. कंपास पेटी, पेन्सील, चित्रकला वही रंग पेटी आदी साहित्याचा समावेश आहे. बँक ऑफ बडोदा दर वर्षी या शाळेला काही न काही शैक्षणिक मदत करत असते मागील वर्षी त्यांनी शाळेला चार संगणक संच भेट दिले होते त्यामुळे आज या शाळेतील मुलांना संगणक शिकणे सोपे झाले आहे.
साहित्य बँकेच्या 110 व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात आल्याचे बँकेचे व्यवस्थापक प्रमोद दीक्षित यांनी सांगितले. पुढील वर्षीही आम्ही या मुलांना शैक्षणिक मदत होईल असे काहीतरी करू आणि यांच्या भविष्यासाठी आमच्यापरीने हातभार लावू असेही ते म्हणाले. यावेळी सहव्यवस्थापक शिवभूषण यादव,कर्मचारी रामचंद्र दवणे, सचिन शेते, जितेंद्र हरदास, दीपा रूट, दिगंबर कुल, शाळेचे शिक्षक हनुमान सुरनर, रामभाऊ घुगे, माचीन्द्र कापरे, आप्पा वावरे, लालासाहेब डोले, संतोष चव्हाण, लक्ष्मिकांत ठाकुरद्वारे, विजय लोखंडे, रमेश फरताडे, बीरु खरात, राहुल होवाळ, विष्णू सानप आदी उपस्थित होते.