बडोले यांच्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन

0

सणसवाडी  । पेरणे येथील रणस्तंभास 200 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने बुद्धिस्ट मुव्हमेंट सेंटर व नालंदा बुध्द विहारच्या वतीने सणसवाडी येथे भव्य रांगोळीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या भव्य रांगोळीचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते रविवारी सकाळी होणार आहे.

ही रांगोळी सुदामराव पवार सभागृहात काढण्यात आली आहे. या रांगोळीत भगवान गौतम बुद्ध, सांची प्रवेशद्वार, बुद्ध गया, विजयस्तंभ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर याबरोबर सुदामराव पवार, त्यांच्या पत्नी ताराबाई पवार व ज्येष्ठ पत्रकार बबनराव कांबळे यांच्या भव्य प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत. ही रांगोळी 95 फूट बाय 35 फूट असून भिवंडी येथील नामवंत रांगोळीकार महेश पाटील, प्रेम जोशी, दिलीप पाटील, संतोष पाटील, उमेश भगत, दिलीप पाटील, केतन पाटील, अंकीत पाटील, पिंटू पाटील, दीप काबुकर, भावेश पाटील यांनी सलग चार दिवस काम करून ही रांगोळी साकारली आहे. या रांगोळीचे प्रदर्शन 1 जानेवारी पासून सुरू होणार असून ते आठ दिवस चालू राहणार आहे, असे आयोजक बुद्धिस्ट मुव्हमेंट सेंटरच्या वतीने सांगण्यात आले.