पुणे । देशात आजपर्यंत उद्योगधार्जिणे सरकारच आले असल्यामुळे आजपर्यंत 22 वर्षांत 22 लाख शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. उद्योजकांचे करोडोंचे कर्ज माफ केले जातात, तर शेतकर्यांचे कर्ज माफ का केले जात नाही, असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला. उरुळी देवाची येथील सोनाई मंगल कार्यालयामध्ये भ्रष्टाचार निर्मुलन जनसंघटनेने आयोजित केलेल्या जाहीर सभेत अण्णा बोलत होते.
23 मार्चच्या आंदोलनाची तयारी
देशातील शेतकर्यांच्या मालाला योग्य हमीभाव, लोकपाल कायद्याची अंमलबजावणी, निवडणूक प्रक्रियेत बदल या विविध मागण्यांसाठी 23 मार्चपासून दिल्ली येथे अण्णांमार्फत सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे, त्या आंदोलनांची दिशा स्पष्ट करताना अण्णा हजारे यांनी सरकारला जाब विचारला. याप्रसंगी एक मिस्डकॉल देऊन आंदोलनांला पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली. तसेच आंदोलनाला तन-मन-धनाने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी राधेश्याम जगताप, दिलीप भाडळे, दिलीप ढोणे, रघुनाथ पाटील, रवींद्र बर्डे, ज्ञानेश्वर राजमाने उपस्थित होते.