आमदार संजय सावकारे यांची मागणी
दीपनगर :- दीपनगर प्रकल्पामुळे अनेकांच्या हाताला रोजगार मिळणार असून स्थानिक स्तरावरील कंत्राट स्थानिकांनाच मिळावे, ते मोठ्या कंत्राटदारांना मिळू नये, अशी अपेक्षा आमदार संजय सावकारे यांनी मनोगतात व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस दौर्यावर आले असते तर त्यांना भुसावळच्या अनेक प्रश्नांविषयी सांगता आले असते मात्र लवकरच त्यांची भेट घेवून समस्या सांगण्यात येतील, असेही ते म्हणाले.