न्यायालयाचे आदेश : ठेवीची रक्कम मिळत नसल्याने ठेवीदाराची न्यायालयात धाव
वरणगाव- मुदत ठेवीनंतरही रक्कम न मिळाल्याने ठेवीदाराने न्यायालयात धाव घेतल्यानंतर बढे पतसंस्थेच्या तत्कालीन चेअरमनसह संचालक मंडळाविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा वरणगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला. ठेवीदार बाबूराव दामोदर महाजन यांनी संस्थेकडे ठेवलेली ठेव मुदत संपल्यावर मिळाली नाही. एक लाख 40 हजारांची ठेव मागूनही मिळत नसल्याने महाजन यांनी न्यायालयाल दाद मागितली.
तत्कालीन चेअरमनसह संचालकांविरुद्ध गुन्हा
न्यायालयाने संस्थेची पत असतांनाही संचालकांनी देवीची रक्कम ठेवीदाराला मुदत संपूनहि परत न केल्याने आरोपी चंद्रकान्त बदे पत्तसंस्था सह तत्कालीन संस्थेचे अध्यक्ष बारसु दयाराम पाटील, राजेंद्र पुंडलिक चौधरी, नारायण सीताराम पाटील, नीळकंठ शालिग्राम झोपे, नीळकंठ रामदास सरोदे, अशोक एकनाथ महाजन, शशिकांत आत्माराम पाटील, प्रकाश भानुदास चौधरी, शे.शकील शे. अल्लाउद्दीन, रवींद्र अतुल झांबरे, वसंत नथू बावस्कर, लक्ष्मीकांत धोंडू माळी, रवींद्र शांताराम सोनवणे, संचालिका शशी संजीव कोलते, चारुलता राजेंद भंगाळे, व्यवस्थापक शिरिष अडकमोल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक निलेश वाघ, पोलीस कॉन्स्टेेबल सुनील वाणी, नागेंद्र तायडे, मझहर पठाण करीत आहेत.