बत्तीसशिराळ्याच्या नागपंचमी परंपरेबाबत अहवाल द्यावा

0

मुंबई । सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा गावची नागपंचमीची परंपरा हा श्रद्धेचा भाग आहे. तसेच ही परंपरा फक्त एका गावापुरती मर्यादित आहे. ही बाब लक्षात घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून ही परंपरा फक्त या एका गावात कशी सुरु ठेवता येईल, वन्यजीव अधिनियमांतर्गत या गावाला कम्युनिटी रिझर्व्ह घोषित करून नागपंचमीची परंपरा पुढे सुरु ठेवता येऊ शकेल किंवा कसे याचा देखील याचा अभ्यास करुन विधी व न्याय विभागाने वन विभागाकडे अहवाल सादर करावा, अशी सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच यासंबंधी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार शिवाजीराव नाईक, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव एन.जे जमादार, वन विभागाचे सचिव विकास खारगे, यांच्यासह गावातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.

जीवंत नागांची पंचमी बंद करण्यात आली होती
सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा गावात जिवंत नागांची पूजा करून नागपंचमी साजरी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून होती. परंतू या प्रथेविरुद्ध वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर त्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर नागांच्या प्रतिमेचे पूजन व प्रदर्शन करून ही परंपरा पुढे सुरु ठेवण्यात आली. परंतू बत्तीस शिराळा गावातील नागपंचमीची परंपरा पारंपरिक पद्धतीने सुरु राहावी, ही ग्रामस्थांची मागणी आहे. त्याअनुषंगाने आमदार शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. त्यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते