यावल। हॅकर मनिष भंगाळे याने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर दाऊद इब्राहिम याच्या पत्नीशी दूरध्वनीवरुन संवाद झाल्याचा बिनबुडाचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलीसांनी यामागील खर्या सुत्रधारांचा तपास घेऊन कारवाई करण्याची मागणी भाजपातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसिल प्रशासनास निवेदन देण्यात आले. यात नमूद करण्यात आले की, हॅकर भंगाळेला अटक करण्यात आली आहे. तरी भंगाळे सोबत बोलते धनी असलेले अंजली दमानिया, प्रिती मेमन यांनी सुध्दा आरोप केले होते. यांना अटक करण्यात यावी व यांच्यामागे अजुन कोन बोलते धनी आहे हे सुध्दा जनतेसमोर आणून यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, भाजपा शहाअध्यक्ष हेमराज फेगडे, माजी जिल्हा चिटणीस किशोर कुलकर्णी, जेष्ट कार्यकर्ते बापूजी भोसले, जेष्ट कार्यकर्ते गोपालसिंग पाटील, माजी नगरसेवक उमेश फेगडे, युवा मोर्चा सरचिटणीस स्नेहल फिरके, रितेश बारी, एजाज देशमुख, कल्पेश पाटील आदी उपस्थित होते.