Molestation of young girl in Bhalod Village : Accused Youth Arrested यावल : तालुक्यातील भालोद येथे तरुणीचा पाठलाग करून तिला धमकी देत विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून तरुणाविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.
बदनामी करण्याची दिली धमकी
20 वर्षीय तरुणीच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी राजेंद्र जितेंद्र भालेराव (26) याने तरुणीशी लग्नाचा आग्रह धरला व लग्न न केल्यास प्रेमसंबंध असल्याची बतावणी करून बदनामीची धमकी दिली तसेच लग्न न केल्यास घरातील लोकांना फसवून मरून जाईल, अशी धमकीही देत होता. 23 ते 26 सप्टेंबर दरम्यान हा प्रकार घडला.
आरोपीला पोलिसांकडून अटक
तरुणीने या प्रकरणी फैजपूर पोलिसात तक्रार दिल्यानंतर राजेंद्र जितेंद्र भालेराव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व पोलिसांनी आरोपीला अटक केली. तपास नाईक किरण चाटे करीत आहेत.