बदलत्या काळानुसार ‘सायबर पॅरेटिंग’ महत्वाचे

0

डिजीटलच्या युगात मुलांचे वागणे खूप बदललेले आहे. मुले सतत कंटाळलेली असतात, त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रीत करता येत नाही कशाचाही धीर नसतो, एकदम चिडतात, संयम नसतो, जितक्या लवकर निराश होतात, त्याचे सोशल मिडियावर खूप मित्र असतात पण खरे मित्र नसतात. अगदी साध्या साध्या गोष्टींनी ती अस्वस्थ होतात, संतापतात कधी कधी तर टोकाचे पाऊल उचलतात. मुलांच्या एकुणच सामाजिक, भावनिक कामे आणि ईयास यात वेगाने र्‍हास होत चालला असून त्यांच्यात अकार्यक्षमता, नैराश्य आणि आक्रमक वाढत चालले आहे. आजकाल मुले शाळेत शिकण्यासाठी भावनिकदृष्या तयार होण्यापुर्वीच दाखल होतात. याशिवाय आपल्या आधुनिक जीवनशैलीतील अनेक बाबी मुलांच्या यास्थितीला कारणीभूत ठरतात.

यातील काही पाच महत्वाची मुद्दे
1 तंत्रज्ञान : मोफत पाळणाघर
व्हर्च्यूअल रिलिटींच्या तुलनेत आपले दैनदिन जीवन बोअरिंग आहे, असे मुलांना वाटते. कारण ती जेव्हा शाळेतच्या वर्गात येतात तेव्हा त्यांच्या आवतीभवती मानवी आवाजासह मोबाईलच्या स्क्रीनवर ते पाहत आणि ऐकत असतात. त्या आवाजाचे परीणाम आणि आकर्षक ग्राफिक्सच्या तुलतने ते वास्तव जग अगदीच मिळमिळीत मुलांना वाटते. व्हॅर्च्यूअल रिलिटीत अनेक तास रममाण झालेल्या मुलांना प्रत्यक्ष जगातील खरेपणा पटतच नाही. त्यांना आईवडीलांशी असलेले भावनिक नातेही जोडणे कठीण होऊन बसते. म्हणूनच पालकांनी तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित करावा. मुलांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालावा. त्यांना घेऊन सहलीला जा, फिरायला जा, अगदी बागेत घेवून जा, त्यांच्यासोबत खेळा किंवा गप्पा मारा.

2 हट्ट पुरवणे
मुलांचे हट्ट केला की पालक त्यांचा हट्ट पुरवायला मागे पुढे पाहत नाही. मुलाच्या तोंडून मागणी बाहेर पडण्याच्या अवकाश, ती मागणी लगेच पुर्ण होते. मुलाला भूक लागलीय, स्नॅकचे पाकीट लगेच हजर, तेही जंकफूडचे. मुलाला तहान लागली की शितपेयाची बाटली त्याच्यासमोर हजर असते. मुलाला कंटाळा आलय की पालक लगेच आपला फोन पुढे करतात नाहीतर टीव्ही पहायला सांगतात. मुलाला लहानपणी एखादी गोष्ट मिळण्यासाठी वाट पहायला लागणे ही बाब त्याच्या भविष्यकालीन यशासाठी आवश्यक असते. पण आपल्या सगळ्यांनाच आपल्या मुलांना आनंदी ठेवायचे असते. दुदैवाने आपण त्यांच्या दीर्घकालीन नाही तर क्षण्कि आनंदाचा विचार करतो. एखाद्या गोष्टींसाठी मुलांना वाट पहायला लावणे, किंवा ती त्यांना लगेच न देणे यातून मुलांना ताणतणावात कसे काम करायचे, त्याचा सामना कसा करायचा हे समजू लागते. आपली मुले अगदी छोटा तणावही सहन करून शकत नाही आणि त्यामुळे त्यांना लवकर नैरायश् येते. त्यांच्या पुढील आयुष्यात यश मिळण्यात त्यामुळे मोठा अडथळा निर्माण होता. म्हणूनच मुलांचे हट्ट लगेच पुरवू नका. त्यांना वाट पहायला शिकवा. तशीच तातडीची निकड नसेल तर एखादा हट्ट पुरवला नाही तरी चालेल.

3 मुलांची शिरजोरी
अनेक पालक तक्रारी करतात, माझा मुलगा किंवा मुलगी नाष्टा करत नाही. त्याल अमुक भाजी आवडत नाही, म्हणून मग तमेक भाजी करावी लागते. त्यांला किंवा तिला खेळणी आवडत नाही, म्हणून मग मी ऑयपॅडच देतो खेळायला, कुणाला रात्री लवकर उठायचे नसते मुलांना लहरीप्रमाणे पालक त्यांच्या मागण्या पुरवताना मेटाकुटीला येतात. लहान मुलांचे नुसतेच लाड करायचे नसतात, त्यांना शिस्त लावायची असे, त्यांच्यावर संस्कारही करायचे असतात. आपण सगळेच मुलांच्या मर्जीवर सोडले तर पास्ता, टीव्ही, स्मार्टफोन, आयपॅड यात रममाण होतील. आपण त्यांना जे पाहिजे ते देत असाते, आणि हे योग्य नाही हे आपल्यालाही माहित असते. योग्य पोषक आहार आणि रात्री पुरेशी झोप मिळाली नाही तर मुली शाळेत चिडचिड करतच जातात, त्यातच भर पडते ती तणाव आणि अभ्यासात लक्ष न लागण्याची. आपल्याला मुलांना योग्य वळण लावयचे असेल तर जे आावश्यक आहे ते करावे लागेल आणि मुलांनाही ते करण्यासाठ उद्यूक्त करावे लागेल, नव्हे त्यांच्याकडून करवून घ्यावे लागले. आपली मुलांनी अभ्यासात प्रगती करावी असे वाटत असले तर त्यांनी अभ्यास करणे आवश्यक आहे याची जाणीव त्यांना करून घ्यावी लागले. जर तुमचा मुलगा उत्कृष्ट खेळाडू बनू पाहत असेल तर त्याल त्याच्या खेळाचा सराव सातत्याने करावा लागले. आजच्या मुलांना अव्वल तर व्हायचे असते, पण त्यासाठी जे कष्ट करण्याची गरज आते, ते करण्याची त्यांची तयारी नसते, म्हणजे त्यांना तशी सवय लावलेली नसते. म्हणूनच त्यांना जे हवे आहे ते मिळवण्यासाठी कष्ट करण्याची गरज असते याचे भान मुलांना देण्याची गरज आहे.

4 नुसती गंमत
आजकाल पालकांनी आपल्या पाल्यासाठी मौजमजेचे, गमतीचे एक जग तयार केले आहे. मुलांना कुठल्या ना कुठल्या क्टीव्हीटीत गुंतवले जाते आण या क्टीव्हीटीज एकामागून कए सुरूच असतात. मुलांना जराही उसंत नसते. कधी ते मूल जरा शांत बसले की लगेच आपल्याला वाटते की पालक म्हणून आपण आपल्या कर्तव्यात कसूर करत आहोत. पुर्वी लहान मुले आईवडीलांन घरातील घरकामात मदत करत होते. घरातील बारीक सारीक कामे, कपड्यांच्या घड्या घालणे, दळण दळून आणणे, भाजी निवडणे, भाज्या चिरून देणे असे अनेक कामांत मुलांचा हातभार असे. आपला अभ्यास ती स्वत: करत, ना त्यांन ट्यूशनची गरज भासत असे, ना आईवडीलांना सांगावे लागत असे, मुले अंगणात, मैदानात भरपूर खेळतही असत, पालकही मुलांना खेळण्याची मुभा देत, आत तसे राहिलेले नाही. मुलांना संगीत, नृत्य, खेळ अश क्टीव्हीटीजमध्ये गुंतवले जाते. त्यात त्यांनी किती रस असतो हे माहिती नसते. या वातावरणातून त्यांना काही काळ बाहेर काढा. मुलांना स्वत:च्या कपड्यांच्या घड्या घालणे, आपल्या अभ्यासाचे टेबल आवरून ठेवणे, जेवनानंतरचे अवारून घेणे, आपली स्कूलबॅग स्वत: भरणे अशी कामे करायला द्या. त्यांना असा वेळ द्या की त्या कामसाठी त्यांना काही मर्यादा घालून द्या. जेवण, झोप, अभ्यास, खेळ, तंत्रज्ञानाचा वापर वगैरेसाठी शक्यतो वेळापत्रक ठरवा.

5 मुलांचे सामाजिक संबंध विस्तारावेत
जी मुले मैदानी खेळ खेळतात, त्यांना आपोआपच समाजात वावरायचे कसे याचे ज्ञान मिळते, ते कौशल्य त्यांच्यात येते. पण आता स्पर्धा आणि बांधीव क्टीव्हीटीज आणि तंत्रज्ञान यांनी आता मैदानी खेळाची जागा घेतली आहे. यशस्वी लोकांकडे समाजाशी संवाद साध्याचे कौशल्य असते. अशा प्रकारचे कौशल्यही आता मुलांना शिकवण्याची वेळ आली आहे. त्यांना वागण्याची पद्धत (मॅनर्स), एकमेकांना सहकार्य करणे, टीमवर्कचे महत्व शिकवणे आवश्यक आहे. पुढची पिढी आनंदी, निरोगी आणि यशस्वी बनवणे हे प्रत्येक आईवडील व पालकांचे काम आहे हे लक्षात घ्या.

– जितेंद्र कोतवाल, वरिष्‍ठ उपसंपादक, जळगाव
9730576840