जळगाव । जीवनशैलीत काळानुरुप बदल जसे स्वीकारले जात आहे. तसेच बदल गुंतवणुकीच्या पद्धतीत आवश्यक आहे. असा रोटरी सेंट्रल व अरिहंत कॅपिटल आयोजित चर्चासत्रात मान्यवरांचा सूर उमटला.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शेअर व म्युच्युअल फंड गुंतवणूकीविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रमुख वक्ते हेमंत काळे (मुंबई), अविनाश सारडा (इंदौर), रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष संजय तोतला, सचिव सुनिल महाजन, प्रकल्प प्रमुख एस.के.वाणी, राहुल जैन यांची उपस्थिती होती. अविनाश सारडा यांनी गुंतवणूक करतांना आर्थिक नियोजन महत्वाचे असून बचत व गुंतवणूक यातील फरक सांगितला. येत्या चार वर्षात 1 हजार आयपीओ शेअर बाजारात येणार आहे. विमा व मुदत ठेव याला गुंतवणूक म्हणता येणार नाही, असे सांगून टीआरपी म्हणजे टार्गेट इन्व्हेसमेंट प्लॅन करा असे आवाहन केले.