बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण वयातही वाढले हाडांचे आजार

0

भुसावळ। वाढत्या वयाबरोबर हाडे आणि स्नायु तसेच सांधे कमजोर होतात त्याचबरोबर बदललेली जीवनशैली, उठण्या-बसण्याची चुकीची पद्धत, व्यायामाचा अभाव, विलासी जीवन यामुळे तरुण वयातही हाडांचे आजार वाढण्याचे प्रमाण वाढत आले आहे, असे मत अस्थिरोग तज डॉ.निलेश चौधरी यांनी व्यक्त केले. गणेश कॉलनी व परिसर जेष्ठ नागरिक संघातर्फे जळगाव रोड जवळील महादेव मंदिरात ‘वृद्धापकाळ : हाडांच्या समस्या निगा व काळजी’ या विषयावर व्याखान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

उतारवयातील आजारांची माहिती
पुढे ते म्हणाले कि, तरुण वयात जर रोज व्यायामाची सवय लावली तर निश्चितच उतार वयात हाडांचा त्रास कमी जाणवेल. आहारात पोषक द्रवे, कॅल्शियम आणि ‘ड’ जीवनसत्व यांचे प्रमाण कमी झाल्याने हाडे कमकुवत होतात आणि वाढत्या वयाबरोबर हाडांचा क्षय सुरु होते मग कधी कधी फ्रॉक्चर होणे, अशी स्थिती निर्माण होते. यावेळी मानेपासून तर पायाच्या तळव्या पर्यंत सर्व आजाराची महिती सविस्तर देण्यात आली.

प्रश्‍नोत्तराद्वारे केले शंकांचे निरसन
नंतर सर्व सभासदांना माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आल्या. शेवटी प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम संपन्न झाला. डॉ.नितु पाटील यांनी केलेल्या या जेष्ठ नागरिकांचे संगठन नक्कीच कौतुकास्पद आहे असे नमूद करण्यास देखील डॉ.चौधरी विसरले नाही. स्वागतगीत यमासा भावसार, प्रास्तविक धनराज पाटील, व्यक्ती परिचय डॉ.नितु पाटील, आभार प्रदर्शन प्रभाकर झांबरे यांनी मानले.

अधून मधून म्हणजे काय?
सूत्रसंचालन शरद लोखंडे यांनी केले. यावेळी जेष्ठ नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकाने सांधे दुखीवर अधून मधून वेदनाशामक गोळया घेतल्या तर काही अपाय नाही ना? असा प्रश्न विचारला तेव्ह्य दिवसातून दोन वेळा की महिन्यातून एक दोन वेळा महणजे अधून मधून का? असा प्रतिप्रश्न डॉ.निलेश चौधरी यांनी विचारल्यावर सभागृहात हास्याची तरंग उमटली. कारण प्रत्येकाची अधून मधूनची व्याख्या वेगळीवेगळी असते.