बदलत्या हवामानावर मंत्री, आमदारांना मार्गदर्शन 

0
मुंबई :- ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक व लेखक अतुल देऊळगावकर यांच्या ‘बदलते हवामान : आव्हाने आणि उपाययोजना’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक २१ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत विधानभवनात होणाऱ्या  व्याख्यानप्रसंगी, दोन्ही सभागृहाचे सभापती, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, मंत्री उपस्थित राहणार आहेत.

देऊळगावकर हे या विषयावर विधानभवनात विधीमंडळ सदस्यांशी संवाद साधणार आहेत. वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समृद्ध पर्यावरण परंपरा जपण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. जागतिक हवामान बदलामुळे व वाढत्या भौतिक विकासामुळे सर्वाधिक फटका पर्यावरणाला बसतो आहे. जगात व देशात हवामान बदलाच्या समायोजन उपाययोजनांचा उहापोह या व्याख्यानात होणार आहे.