‘बदला’ने शंभर कोटींचा टप्प्या ओलांडला !

0

मुंबई: अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘बदला’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतांना दिसत आहे. ‘बदला’ हा चित्रपट 8 मार्च ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने आता 100 कोटींचा पल्ला पार केला आहे. ‘बदला’ या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 38 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 29.32 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 11.12 कोटी तर चवथ्या आठवड्यात 5.25 कोटी कमावले. या चित्रपटाने पाचव्या आठवड्याच्या शुक्रवारी 30 लाख, शनिवारी 55 लाख, रविवारी 72 लाख, सोमवारी 20 लाख, मंगळवारी 20 लाख, बुधवार 20 लाख, गुरुवार 20 लाख रुपयांचे कलेक्शन करत 100 कोटींचा टप्पा पार केला.

‘बदला’ हा चित्रपट सुपरहिट झाला असला तरी या चित्रपटाला मिळालेल्या यशाकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले असल्याची खंत अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली होती. या चित्रपटाच्या यशाची निर्माते, डिस्ट्रीब्यूट तसेच बॉलिवूड मधील कोणत्याही व्यक्तीने दखल घेतली नाही असे अमिताभ यांचे म्हणणे आहे. अमिताभ यांनी ट्वीट करून याबाबत त्यांचे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या ट्वीटवर या चित्रपटाचा निर्माता शाहरुख खानने लगेचच रिप्लाय दिला होता. त्याने ट्वीटमध्ये म्हटले होते की, सर, तुम्ही आम्हाला पार्टी कधी देत आहात याची आम्ही आतुरतेने वाट पाहात आहोत. आम्ही रोज रात्री जलसाच्या बाहेर यासाठी उभे देखील असतो.