बदली हवी आहे का बदली; अर्ज करा 31 जानेवारीपूर्वी!

0
अधिकारी, कर्मचार्‍यांना पालिकेचे आवाहन
पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील गट ’अ’ ते गट ’ड’ मधील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या लवकरच अंतर्गत बदल्या होणार आहेत. एप्रिल व मे महिन्यात बदलीस पात्र ठरणा-या प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांची विभागप्रमुखांनी माहिती द्यावी. तसेच ज्या अधिकारी, कर्मचा-यांना वैयक्तीक अथवा वैद्यकीय कारणास्तव बदली हवी असल्यास त्यांना 31 जानेवारीपर्यंत विभागप्रमखांमार्फत प्रशासनाकडे अर्ज करावे लागणार आहेत.
तीन वर्षांची सेवा पूर्ण…
प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे यांनी याबाबत सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यांबाबतचे सर्वकष धोरण निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेच्या प्रशासनातील गट ’अ’, ’ब’, ’क’ आणि ’ड’ या चार गटातील जे अधिकारी आणि कर्मचारी तीन वर्षाची सेवा कालमर्यादा पूर्ण करतात. त्यांची बदली केली जाणार आहे.
एप्रिल, मे मध्ये होतील बदल्या
विभागातील गट ’अ’ ते ’ड’ मधील तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले तसेच जे अधिकारी, कर्मचारी एप्रिल व मे महिन्यात बदलीसाठी पात्र ठरतात. त्यांची माहिती सादर करण्यात यावी. त्याचबरोबर ज्या अधिकारी आणि कर्मचा-यांना वैयक्तीक अथवा वैद्यकीय कारणास्तव बदली करायची असेल. त्यांनी सुध्दा विभागप्रमुखांपर्यत प्रशासन विभागाकडे 31 जानेवारीपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सादर सादर करावयाचे आहेत. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.