जिल्हापेठ पोलिसांची कारवाई : न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलिस कोठडी
भुसावळ- शासकीय टेंडर मिळवण्यासाठी ई-मेलद्वारे बनावट माहिती सादर करुन शासनाच्या 54 लाख 93 हजार 47 रुपयांच्या कामाच्या टेंडरमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळचे ठेकेदार विनय सोनू बढे यांच्याविरुद्ध बुधवारी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी गुरुवारी पहाटे अटक् करण्यात आली. बढे यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र परदेशी (51, रा.मीरा हौसिंग सोसायटी) यांनी फिर्याद दिली आहे. शासकीय टेंडर मिळवण्यासाठी सिंगल इंटरेस्टींग, हरीद्वार या नावे बनावट व खोटी माहिती बढे यांनी सादर केल्याचा आरोप आहे. दरम्यान, जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड म्हणाले की, या प्रकरणाच्या खोलवर मुळापर्यंत आम्ही जावून तपास करणार आहोत. तपासात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. आरोपीला 28 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.