A 19-year-old girl from Bhusawla was defamed through a fake account on social media जळगाव : सोशल मिडीयावर फेक अकाउंटद्वारे जळगावातील 19 वर्षीय युवतीची बदनामी करण्यात आली. याबाबत जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा
भुसावळ शहरातील हुडको कॉलनीत 19 वर्षीय तरुणी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. दरम्यान 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2022 दरम्यान तिच्या नावाने बनावट अकाउंट इंस्टाग्रामवर बनवून तरुणीची बदनामी केली. दरम्यान ही गंभीर बाब तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने नातेवाईकांना सांगितले. व नातेवाईकांच्या मदतीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.