बनावट कागदपत्रांनी ठिबक कर्जाचा अपहार

0

दोंडाईचा। बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतात ठिबक सिंचन योजना राबविण्यासाठी 6 लाखांचे कर्ज काढण्यात आले. यातून शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याची तक्रार अमराळे येथील एका महिलेने पोलिसात केली असून बँक अधिकार्‍यांसह एजंट आणि ठिबक सिंचनचे साहित्य पुरविणार्‍या एजंसीवर गुन्हा दाखल झाला आहे.

बनावट कागदपत्रे असल्याचा आरोप
याकामी शेवाळे येथील ठिबक सिंचन एजंट रणजितसिंग आनंदसिंग गिरासे, तामथरे येथील मनोज मगन वाणी, शेवाळे येथील भगवान पंडीत देशमुख आणि कर्ले येथील रतिलाल कौतिक पाटील यांनी मदत केली. हे कर्ज 3 मार्च 2016 ते 3 जानेवारी 2017 दरम्यान देण्यात आले असून त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आशाबाई पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने दिली तक्रार
याबाबत अमराळे येथील आशाबाई दिलीप पाटील या 38 वर्षीय महिलेने तक्रार केली असून तीचे सासरे व पतीच्या नावे असलेल्या शेत गट क्र.76/1,173/2 आणि 173/3 या जमिनीवर ठिबक सिंचनचे 6 लाखांचे कर्ज बँक ऑफ महाराष्ट्रचे तत्कालीन शाखाधिकारी ए.बी.कोकणी व तत्कालिन कृषि कर्ज अधिकारी जे.जे.पाटील यांनी मंजूर करुन त्याचा डिमांड ड्रॉफ्ट वसमाने येथील चेतना एजंसीचे संभाजी ऊर्फ संदीप वसंत पाटील (देसले) यांना दिला.