धुळे । बनावट आधारकार्डासह इतर कागदपत्र तयार करुन प्लॉटची नोंदणी करणार्या साक्रीरोडच्या पाच जणांविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक दुय्यम निबंधक मौहम्मद अब्दुल हक यांनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार साक्रीरोडवरील मिशन कंपाऊंड येथे राहणार्या रविकांत अरविंद जाधव, कल्पना फेडरीक डॅनीअल (बनावट व्यक्ती)आशिष अविनाश एकडे, शेखर भिमराव कुरे, (दोघे एजंट), शैलेश अल्हाट लेवी, साक्षीदार यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट कागदपत्रांनी प्लॉटची खरेदी साक्री रोडच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा महिंदळे शिवारातील सर्व्हे नं.50/ 2 मधील बखळ प्लॉटची दुय्यक निंबंधक कार्यालयात नोंदणी केली.बनावट आधारकार्ड आणि इतर कागदपत्रे तयार करुन त्यांनी शासनाची फसवणूक केली.भादंवि 420, 468, 471, 34 प्रमाणे आरोपींविरुध्द्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास पीएसआय आखाडे करीत आहेत.