बनावट चावीच्या साहाय्याने लॉक उघडून स्विफ्ट कार चोरली

0

वाकड : बनावट चावीच्या साहाय्याने लॉक उघडून चोरटयांनी घरासमोर पार्क केलेली स्विफ्ट कार चोरून नेली. ही घटना रविवारी पहाटे पाचच्या सुमारास कस्पटेवस्ती, वाकड येथे उघडकीस आली. या प्रकरणी दशरथ भाऊ कुडले (वय 30, रा. खाटपेवाडी, भुकूम) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुडले शनिवारी वाकड येथे त्यांच्या नातेवाईकांकडे आले होते. रात्री झोपताना त्यांनी घरासमोर कार पार्क केली. दरम्यान, मध्यरात्री चोरटयांनी बनावट चावीच्या साहाय्याने लॉक उघडून कार चोरून नेली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.