बनावट दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

चोपडा। येथील सेतू कार्यालयातून वितरित होणार्‍या विविध दाखल्यांसाठी उत्पन्नाचा दाखला लागतो. तहसीलदारांच्या नावे असलेला बनावट दाखला बनवून दिल्या प्रकरणी सत्यजित मच्छिंद्र सपकाळे याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 मे 2017 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान चोपडा तहसील कार्यालयाच्या आवारात सेतू सुविधा केंद्र व महा- ई सेवा केंद्राज हिमांशू ज्ञानेश्वर पाटील व हितेश भगवान पाटील दोन्हीही आडगाव येथील आहे.

जातीच्या दाखल्यासाठी उपद्व्याप
नॉन क्रिमिलियरसाठी रवींद्र विलास महाजन यांच्याकडे जातीचा दाखला मिळण्यासाठी केलेल्या प्रकरणात चोपडा तहसीलदार यांचे उत्पन्नाचे बनावट दाखला तयार करून तो खरा आहे असा भासवून लाभधारकाना देऊन त्यांचेकडून दाखल्याचे पैसे घेतले. शासनाची फसवणूक केली म्हणून चोपडा शहर पोलीस स्टेशनला विनोद हेमचंद सोनवणे जिल्हा समन्वयक गुजरात इन्फोटेक ली. मालेगाव यांच्या फिर्यादीवरून बाळा उर्फ सत्यजित मच्छिंद्र सपकाळे यांचेवर भाग 5 गुरन 8517 भदवी 420, 465, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार भालचंद्र बाविस्कर हे करीत आहेत.