धुळे । पांझरा नदीच्या किनारा लगत मन्या बडगुजर यांच्या शेता लगत असलेल्या कोरड्या विहरीजवळ गावठी हातभट्टी दारु निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हा शाखा पोलिसांनी छापा टाकून कारखानाच उद्ध्वस्त केला असून याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पांझरा नदीच्या किनारा लगत बनावट दारुनिर्मितीचा कारखाना सुरु असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा शाखा पोलिसांना मिळाली होती.
रसायनासह साहित्य केले जप्त
आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास स्थागुशा व आझाद नगर पोलीस पथकाने छापा टाकून दोघांनन अटक केली. यात जिभाऊ नानु मालचे (वय 44) रा. जुने धुळे व दिनेश सदाशिव गायकवाड (वय 35) रा. बर्फ कारखाना, जुने धुळे यांना अटक केली. त्यांच्याकडून बनावट दारु निर्मितीसाठी लागणारे 200 लिटर दारूचे बनविण्याचे रसायन, एक पत्री ड्रम, 5 हजार रूपये किमतीचे दोन 2 प्लॅस्टीकचे ड्रम त्यात प्रत्येकी 100 लीटर दारू, 24 हजार किंमतीचे रसायण (वॉश)एकूण 4 प्लॅस्टीकचे ड्रमसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतली असून आझाद नगर पोलिस ठाण्यात स्थानागु पोकॉ चेतन कंखरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक देवीदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ सुनिल विंचुरकर, महेंद्र कापुरे, जितेंद्र आखाडे, गौतम सपकाळे, विजय सोनवणे यांच्या पथकाने केली.