यावल– बनावट देशी दारूचा कारखान्या प्रकरणी अटकेत असलेल्या सशंयीत आरोपी आकाश चोपडे यास यावल न्यायालयाने पुन्हा दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. 27 मार्च रोजी आरोपीस अटक करण्यात आल्यानंतर सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. बुधवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता पुन्हा दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यात बनावट दारू तयार करीत नागरीकांच्या जीवीतास धोका निर्माण करण्याचे कलम वाढवण्यात आले असून आता आरोपीचा खटला व जामिनाबद्दल जिल्हा व सत्र न्यायालयात पुढील कार्यवाही चालणार आहे.