जळगाव ।जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या नावाने जिल्ह्यातील 46 जणांना बनावट नियुक्तीपत्रे दिल्या प्रकरणी दोन संशयितानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी एका संशयिताला अटक करण्यात आली होती. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांनी 10 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
नोकरीचे आमीष दाखवून जि.प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात वर्ग 4 च्या 46 पदांची बनावट नियुक्तीपत्रे तयार करुन प्रत्येकाकडून सुमारे 1 लाख ते 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंतची रक्कम तीन वर्षापूर्वीच उकळण्यात आली. राजू भोजू भोई आणि सुभाष भिकन मिस्तरी या संशयीतांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणा सोमवारी राजू भोई याला अटक केली. त्याला मंगळवारी न्या. पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 10 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.