जळगाव। जि ल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात वर्ग-4 च्या 46 पदांची बनावट नियुक्तीपत्रे देऊन तीन वर्षापूर्वी प्रत्येकाकडून एक ते दीड लाख रुपये उकळण्यात आले आहे. या बनावट नियुक्तिपत्र प्रकरणात जिल्हा परिषदेचे कर्मचारी राजू भोजू भोई आणि सुभाष भिकन मिस्तरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी 6 मार्च रोजी जळगावातून राजू भोई याला अटक केली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर दुसरा संशयित सुभाष मिस्तरी याला 23 मार्च रोजी अटक केली. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत गुरूवारी संपली. त्याला न्यायाधीश गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अॅड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला न्यायालयीन कोठडी
जळगाव- महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप करुन चारित्र्यावर संशय घेऊन दोघांनी हिरा शिवा कॉलनीतील तरुणाला बेदम मारहाण केली. बदनामीच्या भितीने त्या तरुणाने 23 फेब्रुवारीस आत्महत्या केली होती. या प्रकरणातील दुसर्या संशयिताला गुरूवारी अटक केली. त्याला न्या. चौधरी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हिराशिवा कॉलनीत केदार सुभाष पाटील याचे परिसरात राहणार्या एका महिलेशी संबंध असल्याच्या संशयावरून गजानन सुदाम गौरव युवराज सोनवणे या दोघांनी केदारला 22 फेब्रुवारी रोजी मारहाण केली होती. या प्रकारामुळे घाबरलेल्या केदारने आत्महत्या केली होती. या प्रकरणी गजनान निकम आणि गौरव सोनवणे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील दुसरा संशयीत गौरव सोनवणे याला गुरूवारी अटक केली. त्याला न्यायाधीश चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
एकाला कोठडी
जळगाव- कृष्णा विक्रम सोनवणे वय-22 रा. प्रजापतनगर याला शनिपेठ पोलिसांनी 26 मार्च रोजी पिस्तुल व जिवंत काडतूस बाळगतांना अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालायात हजर केले असता त्याला 30 मार्चंपर्यंत पोलिस कोठडीस सुनावली. यानंतर आज गुरूवारी त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपली असता संशतिय कृष्णा सोनवणे याला न्या. एस.बी.देवरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्या. देवरे यांनी सोनवणे याला न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.