बनावट पासपोर्ट वापरणारा नायजेरीअन तरुण ताब्यात

0

पिंपरी-चिंचवड : दुसर्‍या व्यक्तीच्या नावाने पासपोर्टद्वारे भारतात वास्तव्य करणा-या नायजेरीयन तरुणा विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ओकुबा किंगस्ले एबुका असे या तरुणाचे नाव असून तो पिंपळे गुरव येथे वास्तव्य करत होता. त्याने 6 ते 13 डिसेंबरच्या दरम्यान मायदेशी जाण्यास प्रयत्न सुरु केले. यावेळी केल्या जाणार्‍या पोलीस चौकशी व प़डताळणीच्या वेळी तो दुस-याच कोणाच्या तरी नावाचा पासपोर्ट वापरत असल्याचे समोर आले. तसेच त्याच्या व्हीजाची तारीख ही संपली होती.

मैत्रिणीवर उपचारासाठी भारतात
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या मैत्रीणीच्या वैद्यकीय उपचारासाठी भारतात आल्याचे त्याने सांगितले. यावेळी त्याच्या मैत्रीणीचा पासपोर्ट व व्हीजा पात्र असल्याने तिला नायजेरीयाला जाण्यास परवानगी देण्यात आली. मात्र संबंधीत तरुणाला सांगवी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सध्या पुणे परिसरातही गुन्हेगारी क्षेत्रात नायजेरीया, बांग्लादेश, इराण सारख्या देशातील तरुणांचा मोठा हात असल्याचे उघड होत असताना प्रशासनाने अशा परकीय नागरिकांचे वास्तव्य, पासपोर्ट आदीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.