धुळे । पारोळा रोडवरील दिल्लीवाला जीन परिसरात भरवस्तीत एका घरात सुरू असलेल्या बनावट दारू निर्मितीचा कारखाना गुन्हे शाखेने चार दिवसांपूर्वी उद्ध्वस्त केला. घातक रसायन, स्पिरीट, बनावट देशी व विदेशी दारूचा साठा असा एकुण 4 लाख 50 हजार रूपयांचा मुद्येमाल जप्त केला. याप्रकरणी दिनेश प्रभाकर भावसार, पंकज भावसार व अजय भावसार या तिघांना अटक असून ते पोलीस कोठडीत आहेत. बनावट दारु बनविण्यासाठी भावसार बंधुंना भटु केले -वाणी हा व्यक्ती स्पिरीट, रसायक व इतर साहित्य पुरवित असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. मात्र, तो हा माल कोठून आणत होता ? याबाबत माहिती देण्यास पकडलेल्या तीनही आरोपींनी नकार दिला आहे.
20 रोजी केली होती कारवाई
पोलीस अधीक्षक चैतन्या व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना शहरातील पांझरा पोळ येथे बनावट मद्य निर्मिती सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारे दि 20 रोजी पांझरापोळ जवळच राहणार्या दिनेश भावसार याच्या घरात छापा टाकला होता. तेथे मोठ्या प्रमाणात बनावट मद्य निर्मितीचे साहित्य आढळून आले होते. यावेळी तिघे जण बनावट मद्य तयार करीत होते. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. या तिघांनी बनावट मद्य निर्मितीसाठी नाल्याकिनारी एक खोली तयार केली होती. या प्रकरणातील प्रमुख म्हाोरक्या फरार असून पोलीस त्याच्या शोधात आहेत.