जळगाव । मयत झालेल्या आई-वडीलांचे बनावट मृत्यूपत्र तयार करून तीन मुलांपैकी दोन मुलांनी तिसर्या भावाला डावलून वारस म्हणून आपल्या नावावर करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला असून शहर पोलीसात बनावट मृत्यूपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आज जिल्हा न्यायालयातील हजर केले असता दोघांना 13 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
बनावट दस्तद्वारे स्वत:चे लावले नाव
फिर्यादी अनिल नामदेव महाजन (वय-48, रा. आसोदा), आरोपी प्रदिप नामदेव महाजन (वय-56) व दिनेश नामदेव महाजन (वय-45) दोन्ही रा. बळीराम पेठ यांचे वडील नामदेव महाजन हे 13 ऑक्टोबर 2013 रोजी मयत झाले तर आई 22 ऑक्टोबर 2016 मयत झाले. यात आरोपी प्रदिप नामदेव महाजन आणि दिनेश नामदेव महाजन यांनी आई-वडीलांचे बनावट मृत्यूपत्र तयार करून त्यांच्या पश्चात वारस म्हणून नाव लावून घेतले. ही बाबत आरोपींचा भाऊ अनिल महाजन यांना कळाल्यानंतर तलाठी यांच्याकडे तपासणी घेत हरकत घेतली. त्यानुसार आई व वडील दोघांचे बनावट मृत्यूपत्र तयार केल्याचे लक्षात आले. अनिल महाजन यांच्या फिर्यादीवरून शहर पोलासात भाग 5 203/17 प्रमाणे दोन्ही आरोंपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज जिल्हा सत्र न्यायालयातीत न्या. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले होते.