बनावट सातबाराच्याआधारे 85 लाखांची फसवणूक

0

बारामती । एका विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून बनावट सातबाराच्या आधारे जास्तची जमिन दाखवून तब्बल 85 लाख रुपयांचे कर्ज घेऊन करंजे येथील जिल्हा बँकेच्या सोमेश्वरनगर शाखेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या कर्जाद्वारे अनेकजण गब्बर झाले आहेत. अनेकांनी आलिशान गाड्या, बंगले, सोने खरेदी केले असल्याचे समोर येत आहे. दरम्यान याप्रकरणी जिल्हा बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सोमेश्वरनगर शाखेत भेट देऊन माहिती घेतली आहे. संबंधीत कर्जदारांच्या जमिनींचा लिलाव करून ही रक्कम वसूल करण्याचा निर्णय बँकेकडून घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

अनेकांचे लागेबांधे
या घोटाळ्यात अनेकांचे लागेबांधे असूनही हे प्रकरण परस्पर दाबले जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांनी नुकतीच सोमेश्वर शाखेला भेट दिली आहे. हे प्रकरण चव्हाट्यावर येऊ नये, म्हणून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

कडक उपाययोजण्याची गरज
पुणे जिल्हा बँकेत सोमेश्वर शाखेत याअगोदरही बनावट सातबाराच्याआधारे करोडो रुपयांची फसवणूक झाली होती. आता नव्याने पुन्हा अशाचप्रकारे 85 लाखांची फसवणूक झाली असल्याने जिल्हा बँकेच्या सोमेश्वर शाखेला भ्रष्टाचाराची कीडच लागली असल्याचे स्पष्ट आहे. याला आळा घालण्यासाठी त्वरित कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा अजूनही मोठा घोटाळा होण्याची शक्यता नाकारता