बनावट स्वाक्षरीद्वारे डेअरी मालकाला लाखाचा गंडा : सचिवाविरोधात गुन्हा

एरंडोल : तालुक्यातील बाम्हणे येथील साईदुध उत्पादक पतसंस्थेतील सचिवाने परस्पर धनादेशावर बनावट स्वाक्षर्‍या करीत दुध डेअरीच्या मालकाची एक लाख आठ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत कासोदा पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

फसवणुकीचा गुन्हा दाखल
गोविंदा रामदास पाटील (62, बाम्हणे, ता.एरंडोल) यांची गावात साई दुध उत्पादक सोसायटी आहे. त्या दुकानावर कैलास सदाशीव पाटील (रा.बाम्हणे) हे सचिव पदावर नियुक्त आहे. 26 जून रोजी गोविंदा पाटील यांच्या नावे असलेल्या धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून एक लाख आठ हजार 482 रुपये परस्पर काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गोविंदा पाटील यांनी कासोदा पोलिस ठाण्यात धाव घेवून कैलास पाटील विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून कासोदा पोलिस ठाण्यात कैलास पाटील याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार समाधान सिंहले करीत आहे.