बनावट स्वाक्षरीने कंपनीला नऊ लाखांचा गंडा

0

पिंपरी चिंचवड : भोसरीतील ए. पी. कंपनीच्या भागीदारांमधील एकाने कंपनीच्या 9 लाख रुपयांच्या धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून तो चेक स्वतःच्या खात्यात वटवून कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार शनिवारी (दि. 1) औंध येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी गिरधर गोविंद परमार (वय 60, रा. गंगोत्रीनगर, नावेचा रोड, पिंपळे गुरव) याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चिराग पुरुषोत्तम राठोड (वय 45, रा. वनिता पार्क बिल्डींग, फुटी रोड, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. चिराग आणि गिरधर दोघांनी भागीदारीमध्ये ए. पी. कोर्पोरेशन कंपनीची स्थापना केली. दरम्यान, गिरधरने कंपनीच्या बँक खात्यातील 9 लाख रुपयांच्या धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून ते पैसे स्वतःच्या औंध येथील महिंद्रा कोटक बँकेच्या शाखेत वळवून घेतले. गिरधरचे बँक खाते महिंद्राच्या वाकड शाखेत आहे. याबाबत आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार भागीदार चिराग यांनी पोलिसांत दिली आहे. पोलीस तपास करीत आहेत.