बनावट 101 दाखला प्रकरण ; वासुदेव इंगळेसह वसुली अधिकार्‍यांना 9 पर्यंत पोलिस कोठडी

0

भुसावळ- शहरातील श्री संतोषी माता मर्चंण्टस को ऑप.क्रेडीट सोसायटी लि.चे चेअरमन वासुदेव आनंदा इंगळे यांच्यासह पतसंस्थेचे वसुली अधिकारी प्रशांत लक्ष्मण भारंबे (निवृत्ती नगर, वृंदावन पार्क, भुसावळ) यांना बनावट 101 चा दाखला बनवल्याप्रकरणी जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी दुपारी अटक केल्यानंतर मंगळवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता आरोपींना 9 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील तिसरे संशयीत आरोपी

बनावट 101 चा दाखला प्रकरण आले अंगलट
तक्रारदार रवींद्र नारायण भोळे (शांती नगर, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्यांच्या पत्नी संगीता भोळे यांनी संबंधित पतसंस्थेतून कर्ज घेतले होते मात्र कर्ज वसुलीसाठी कुठलीही नोटीस न देता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव इंगळे, त्यांचे संचालक मंडळ, वसुली अधिकारी प्रशांत भारंबे व तत्कालीन सहाय्यक निबंधक गिरीधर फुलाजी अहिरे आदींनी सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधक कार्यालयातून संगनमत करून गुन्हेगारी कट रचत स्वःहस्ताक्षरात 101 चा खोटा दाखला बनवला तसेच त्यावर गोल व आडवा शिक्का मारत तक्रारदाराचा शांती नगरातील बंगला जप्त केला. तक्रारदाराने या कारवाईबाबत सखोल चौकशी केल्यानंतर 101 चा दाखला बनावट बनवला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी जळगाव आर्थिक गुन्हे शाखेसह दिल्लीतील ईडीकडे तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी इंगळे व भारंबे यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने 9 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील संशयीत आरोपी तथा सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक गिरीधर अहिरे यांचा पोलिसांकडून शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक केली जाणार आहे.