तळेगाव दाभाडे : तळेगाव शहर परिसरातील शिवमंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. सरसेनापती दाभाडे घराण्याचे मालकीच्या इतिहासकालीन बनेश्वरचे शिवमंदिरामध्ये भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. ग्रामपुरोहित भाऊ रेडे व अतुल रेडे यांनी अभिषेक आणि पूजा पाठाची व्यवस्था केली होती.
मंदिरावर आकर्षण अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर मुख्य मंदिरा समोर आणि मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंदिरामध्ये पूर्णवेळ भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील कल्याणेश्वर मंदिरातही शिवलिंगाची अभिषेक, पूजा आणि दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिराचे परिसरात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या व विजेची रोषणाई करण्यात आली होती.
कलापिनी जवळील टकले मळ्यातील स्वयंभू महादेव मंदिरातही शिवलिंगाच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. तसेच मंदिरात भव्य मंडप व रस्त्यावर स्वागत कमान उभारण्यात आली होती. विजेची रोषणाई व रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दिवसभर मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. हरणेश्वर टेकडीवरील शिवमंदिर आणि यशवंत नगरमधील शिवमंदिर, तसेच गाव तळ्याकाठावरील शिवमंदिर येथे देखील गर्दी केली होती.