बनोटी-नागद-सोयगाव रस्ता दुरूस्तीची मागणी

0

सोयगाव । सोयगाव ते चाळीसगाव राज्यमार्गावरील बनोटी-नागद-सोयगाव रस्त्याची मोठी दुर्दशा झाल्याने केंद्रीय निधीतून सोयगाव-बनोटी या रस्त्याची डागडुजी करावी अन्यथा नव्याने दुपदरी करण्याची मागणी जि.प. सदस्या पुष्पा काळे यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना रस्त्याची दुपदरीकरण झाल्यास सोयगाव तालुक्याचा चाळीसगाव, नाशिक या मोठ्या बाजारपेठांशी जवळीक होवून सोयगावचा आर्थिकदृष्ट्या विकास होण्यास हातभार होईल, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

औरंगाबाद-पहूर-जळगाव रस्त्याच्या सिमेंटीकरणाच्या शुभारंभप्रसंगी नितीन गडकरी सिल्लोडला आले होते. याप्रसंगी सोयगाव तालुक्यातील एकमेव असलेल्या या सोयगाव-बनोटी रस्त्याची छायाचित्रासह व्यथा पुष्पा काळे यांनी मांडली यावेळी रस्त्याची दुपदरीकरण करण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिल्याने दिलासा मिळाला आहे.