बंगळूरू – फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांचा जगप्रसिद्ध टाइम नियतकालिकाने विश्वातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश केल्यानंतर त्यांना अजून एक मानाचे स्थान मिळाले आहे. सिंगापूरमधील स्टेइट्स टाइम्सने प्रतिष्ठित ‘एशियन्स ऑफ द ईयर 2016’ साठी त्यांची निवड केली आहे. भारतातील व्यापार क्षेत्रात फ्लिपकार्टच्या नाविण्यपूर्ण पावलाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बदल होण्यास मदत झाली.
इ-व्यापार क्षेत्रात फ्लिपकार्टने महत्त्वाची भूमिका
भारतीय बाजारपेठ बदलण्यास अनेक पावले उचलण्यात आली आणि या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली ही आपल्याला अभिमान बाब आहे असे सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी संयुक्त निवेदनात म्हटले. भारतीय ई-व्यापार क्षेत्रात फ्लिपकार्टने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सामान्य नागरिकांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ई-व्यापार करण्यास प्रोत्साहन दिले. यामुळे लाखो लोक पारंपरिक मार्गाऐवजी आता आधुनिक मार्गाने खरेदी करत आहे, असे नियतकालिकाकडून सांगण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातील टाइम नियतकालिकाने सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांचा जगातील प्रभावी 100 व्यक्तीमध्ये समावेश केला होता. 2014 मध्ये हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता.