बबलू नवले हत्या प्रकरणी निवेदन

0

जळगाव । येथील भटक्या विमुक्त जाती व कंजारभाट समाजाचे जळगाव येथील बबलू सुभाष नवले या तरुणाचा इंचलकरंजी येथे खून करण्यात आला या घटनेचा निषेध म्हणून भटक्या विमुक्त हक्क परिषद जळगाव जिल्हातर्फे मा. जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांना दि. 15 रोजी निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा भटक्या विमुक्त हक्क परिषदेचे जिल्हा समन्वयक शालीग्रम पवार, सहसमन्वयक नरेश बागडे, सचिव संदिप घुगे सर, जिल्हा कार्यकारणी सदस्य किशोर सानप सर, निलेश चव्हाण, संजय घुगे, वसंतराव गुंजाळ, धनराजभाऊ पालवे, अनिल जोशी, कंजारभाट समाजाचे कार्यकर्ते दिलीप गागडे, सचिन बाटुंगे, विजय अभंगे, राहुल नेतलेकर, अरुण जोशी आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, बबलु नवले याचा निष्पाप बळी गेला असून मारेकर्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच सी.बी.आय चौकशीची मागणी व हा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि सरकारी म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्त करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.