धुळे- शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील विनय मुकेश जाधव (वय 19, रा. बभळाज, ता. शिरपूर) या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली. त्याने 24 ऑक्टोबरला राहत्या घरी गळफास घेतला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला कुटुंबीयांनी शिरपूर येथील रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्याला देवपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास विनयचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवपूर पोलिसांत शून्य क्रमांकाने नोंद ती शिरपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली.