बभळाज येथे चावडी वाचन कार्यक्रम

0

बभळाज । शिवारातील सर्व खातेदार शेतकर्‍यांना यापुढे संगणीकृत 7/12 उतारे देण्यात येणार आहेत म्हणून हस्तलिखीत 7/12 व संगणीकृत 7/12 यात काही फरक आहे का? तसेच 7/12 उतार्‍यावर आवश्यक असलेल्या सर्व नोंदी बरोबर आल्या आहेत का? किंवा त्यात काही त्रुटी आहेत का याची खातरजमा करण्यासाठी आज बभळाज शिवरातील संगणीकृत 7/12 उतार्‍यांचे चावडी वाचन करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच जगन्नाथ महाजन, माजी उपसरपंच पंडीत राजपूत, अनिल त्रिभुवन, बळीराम पवार, नेश सोनवणे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तलाठी डी. जे. बाविस्कर यांनी 7/12 उतार्‍यांचे वाचन केले व असलेल्या त्रुटी नोंदवून घेतल्या.