शहादा । बरसरे मेघ राया तु अंत नको पाहु.. तु कधी बरसणार, अशा विवंचनेने शहादा तालुक्यातील शेतकरी राजा पावसाची चातकपक्ष्याप्रमाणे वाट पहात आहे. तालुक्यातील एकूण शेतीच्या क्षेञफळापैकी 50 टक्केच्या जवळपास क्षेञफळ बागायती शेतीचे आहे. तर उर्वरीत शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. ज्यावर्षी पावसाळा चांगला त्या वर्षी तालुक्यातील सर्वच शेतकरी आनंदित असतात. 6,7 जूनला पाऊस पडला पण तोहि अल्पसा. शेतक-यांनी बी-बियाणाची खरेदी केली.त्या नंतर पाऊसच नाहि. जून महिना संपण्याच्या मार्गावर तरी तालुक्यात अजुन पावसाचे आगमन झालेले नाही.जोपर्यंत दोन-तीन दमदार पाऊस होत नाही.तोपर्यंत शेतकरीराजा पेरणीसाठी सज्ज होत नाही.पावसाला उशिर तर शेतीला उशिर. सरकारने जसे शेती कर्ज माफीसाठी शेतकरी राजाला वाट पहायला लावले. तशीच वेळ आता या मेघरायाने आणली आहे. बहुतेक शेतकरीनी बी-बीयानांची खरेदी केली आहे जसे एखाद्या उपवर मुलीचा पिता म्हणतो की, एकवेळचे मुलीचे लग्न झाल की, आनंदाचा श्वास घेतो.तशी दशा शेतकरी राजाची असते. शेतात पेरणी होईपर्यंत त्याचे कुठल्याच कामात मन लागत नाही. शेतात पेरणी झाली की, मग शेतकरी राजाची चिंता काहि अंशी कमी होते.माञ तालुक्यात अजुन पावसाची सुरवात नाही म्हणून शेतकरी राजा चिंतातूर दिसत आहे.
बागायती शेती
तालुक्यात पूर्वी नदी नाले बारमाही वाहत असायची म्हणून बरीच शेती ही बागायती असायची माञ आता नदी नाल्यांना पावसाळ्यातच पाणी राहत नाही. त्यामुळे शेतक-यांनी शेतात विहिरी खोदल्या.नंतर दिवसेंदिवस पावसाळा कमी होत असल्याने जमिनितील पाण्याची पातळी खालावत गेली.विहिरींची जागा बोरींगांनी घेतली.आज तालुक्यात अशी स्थिती आहे की, विहिरी पहायला मिळत नाहीत. सगळीकडे बोरींगां आहेत.व त्या बोरींगांच्या पाण्यावरच तालुक्यातील शेतकरी बागायत करीत आहेत.तालुक्यात ब-याच बागायत शेतकरीनी मे महिन्यात कापसाची लागवड केली आहे. कापूसाचे रोपे दिसत आहे. माञ त्याच्यावरही टांगती तलवार आहे. कारण दिवसेंदिवस बोरींगांचे पाणी कमी होत आहे. केव्हा बोरींगां बंद पडतील सांगता येत नीही. या वर्षी तालुक्यात ब-याच बोरींगाना पाण्याची पातळी खालावल्याने बंद पडत आहेत .म्हणून बागायत दार शेतकरीही पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.
लोडशेडींगचा फटका
ग्रामीण भागात बारा बारा तासाचे लोडशेडींग असते. या लोडशेडींगचा फटका जास्त बागायती शेतीला बसत आहे. लोडशेडींग कधी दिवसा असते तर कधी राञी त्यामुळे शेतकरी राञी अपराञी शेतात जाऊन कापसाला पाणी भरत असतो. माञ या लोडशेडींगमुळे कापसाला पुर्णत: पाणी मिळत नाही. त्यामुळे मे महिन्यातील कापूसही संकटात आहे.यावर्षी मे महिन्यातील कापसाच्या लागवडीत घट झाल्याचे दिसत आहे.
बँरेज व धरणांमुळे बोरींगांना जीवदान
तालुक्यात प्रकाशा, सारमखेडा बँरेज तसेच दरा, सुसरी धरण आहेत त्या धरणाचा तालुक्यातील उत्तरे कडील व पश्चीमेकडील भागातील काही बोरींगाना जीवदान मिळाले आहे. या धरण व बँरेजामुळे त्या परीसरातील पाण्याची पातळी स्थिर असल्याचे जाणवते.जर तालुकातील सर्व धरणांना मुबलक पाणी राहिले तर सर्व बोरींगां जीवंत स्वरूपात राहतील आणि शेतकरीराजाला पुर्विचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही.शेतकरी सुखी तर देश सुखी. पण आज उलट स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी दु:खी व देश सुखी ती वेळ आज तालुक्यातील शेतकरी राजा वर आली आहे. तो आजच्या घडीला पावसाची आतुरतेने वाट पहात आहे.ब्राम्हणपुरी भागात केळी लागवडीत यावर्षी वाढ झाली आहे. बहुतेक शेतकरीनी लागवड केली. बाकी शेतीची मशागत करून पाऊसाची वाट बघत आहेत.