बर्थ न दिल्याने मुंबईच्या तिकीट निरीक्षकाला मारहाण

0

भुसावळ- आरक्षित डब्यातून प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशाला बर्थ न मिळाल्याने प्रवाशाने तिकीट निरीक्षकालाच शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना डाऊन 11071 एटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेसमध्ये घडली. या प्रकरणी जयप्रकाश केशरी (47, काशी) या प्रवाशाला लोहमार्ग पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

तिकीट न दिल्याने घातला वाद
जयप्रकाश केशरी या प्रवाशाला वाराणसी जाण्यासाठी कामायनी एक्स्प्रेसचे तिकीट काढले मात्र आरएसी तिकीट असल्याने त्याने गाडीतील तिकीट निरीक्षक सी.व्ही.शेळके (मुंबई) यांच्याशी कल्याण ते कसारा दरम्यान हुज्जत घातली. गाडीत जागा नसल्याचे सांगूनही प्रवाशाचे समाधान न झाल्याने प्रवाशाने तिकीट निरीक्षकाला मारहाण करण्यात आली. यावेळी गाडीतील आरपीएफलाही बोलावण्यात आले मात्र ठरावीक वेळेचा गाडीला थांबा असल्याने असल्याने गुरुवारी सायंकाळी पावणेआठ वाजता गाडी भुसावळात आणल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी ए.के.नौटीयाल यांनी प्रवाशाला ताब्यात घेत लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणले. तिकीट निरीक्षक शेळके यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याप्रसंगी एसीएम अजयकुमार यांनीही घटनेची माहिती जाणून घेतली. प्रसंगी तिकीट निरीक्षक निसार खान, व्ही.के.सचान, एस.एस.जाधव, एस.मुखर्जी (मुंबई), जी.एस.महाजन, एम.डी.फिरके आदींची उपस्थिती होती.