बर्फाखाली गुदमरून चंदगडच्या जवानाचा मृत्यू

0

श्रीनगर : काश्मीरमधील लेह ते श्रीनगर दरम्यानच्या मार्गावर होत असलेल्या हिमवृष्टीमुळे दराज येथे महाराष्ट्रातील जवान महादेव तुपारे यांचा बर्फात गुदमरून मृत्यू झाला.

महादेव तुपारे 16 कुमाँऊ रेजिमेंटमध्ये 2005 मध्ये दाखल झाले होते. ते क्लार्क या पदावर कार्यरत होते. तुपारे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील महिपाळगडचे आहेत. तुपारे यांच्या मृत्युमुळे चंदगड तालुक्यात शोककळा पसरली आहे. हिमवृष्टीमुळे बर्फाखाली गुदमरून महादेव तुपारे यांचा मृत्यू झाल्याचे लष्कराकडून तुपारे कुटुंबीयांना गुरुवारी कळविण्यात आले. लेह-श्रीनगर भागात प्रचंड हिमवृष्टी होत असल्याने तुपारे यांचे पार्थिव पोचविण्यासाठी निकराचे प्रयत्न सुरू आहेत.