बर्‍हाणपूरात जमावाकडून 24 वाहनांची तोडफोड

1
शहरात तणावपूर्ण शांतता ; कठुआ घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण
रावेर:- मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूरात जम्मू काश्मिरातील कठुआ घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चानंतर अज्ञात जमावाने शुक्रवारी दुपारी अचानक दगडफेक सुरू केल्याने शहरात पळापळ झाली तर विशिष्ट जमावाने केलेल्या दगडफेकीत तब्बल 24 वाहनांचे काच फोडण्यात आले असून त्यात महाराष्ट्र शासनाच्या एका बसेचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी या घटनेनंतर जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला तर संपूर्ण शहरात बाजारपेठ बंद झाली असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. काही ठिकाणी दुकाने लुटण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते. बर्‍हाणपूरातील फवारा चौक, शनिवारवाडा, गांधी चौक, तहसील कार्यालय परीसरात जमावाने वाहनांच्या काचा फोडल्या.