बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर राज्य महामार्गावर अपघात

0

शिरपूर । बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर राज्य महामार्गांवरील भटाणे ते तर्‍हाडी गावादरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या अपघाता मयत झालेले डॉक्टर हे ड्युटी करून घरी जात असतांना हा अपघात झाला. भटाणे ते तर्‍हाडी गावाच्या दरम्यान रविवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. शहादा तालुक्यातील कोपर्ली येथील डॉ. हिमांशू हेमंत शर्मा (वय 24) हे येथील डॉ. दिघोरे यांच्या खाजगी दवाखान्यात प्रॅक्टीस करीत होते.

मृतांमध्ये डॉक्टर युवकाचा समावेश
डॉ. शर्मा ड्युटी संपल्यानंतर दुचाकी गाडी क्र. एमएच 15-डीएन 9192 ने आकाश दिलीप कुंभार (वय 22) रा. लोणखेडा सह गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी बडोदाहून शिरपूरकडे येणारा आयशर गाडी क्र. एमएच 40 वाय 2348 वरील चालक दीप नारायण मिश्रा (वय 32) रा. नागपूर हा भरधाव वेगाने येत असतांना दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दुचाकीचा चक्काचुर झाला. यात अपघातात आकाश कुंभार हा जागीच गतप्राण झाला. घटनेचे वृत्त भटाणे येथील ग्रामस्थांना कळताच त्यांनी अन्य जखमी डॉ. हिमांशू वर्मा यास जिल्हा उपजिल्हा रूग्णालयात तातडीने आणले, मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अपघात घडताच गाडीचालकाने पळ काढला होता. मात्र, नागरिकांनी या संदर्भांत शिरपूर पोलिस ठाण्याला कळविल्याने पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे यांच्या पथकाने शहादा चौफुलीवर अपघात करणारी आयशर अडवून चालकास अटक केली.