जळगाव। येथील एका खाजगी रुग्णालयात बछहाणपूर मध्य प्रदेशातील दौलतपूर येथे राहणारे 45 वर्षीय इसमाने अज्ञात कारणावरुन विष प्राशन केले. यावेळी त्यांना कुटूंबियांनी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता गेल्या चार दिवसांनंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मध्य प्रेदशातील बछहाणपूर जिल्ह्यातील दौलतपुरा येथील अजय चंदू चावरे याने अज्ञात कारणावरुन अॅसिड प्राशन केले. यावेळी प्रकृती खालावल्याने कुटूंबियांनी त्यांना उपचारासाठी जळगाव येथे खाजगी रुग्णालयात 28 मे रोजी सायंकाळी 6.40 वाजता दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने अखेर 31 रोजी 8.15 वाजता त्यांचा मृत्यू झाला.