बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाच्या दुरूस्तीसाठी इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले किनगाव येथे रास्ता रोको.
यावल (प्रतिनीधी )राष्ट्रीय महामार्ग म्हणुन ओळख असलेला ब-हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असून या ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघातांची मालिका सातत्याने सुरु आहे मात्र या महामार्गा च्या दुरूस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळख असलेल्या या माहामार्गावर खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असुन या रस्त्यावर रोज अपघात होत असतात. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबधीत विभागाने आजवर काहीही कार्यवाही केली नसून दिवसेंदिवस या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. मध्यप्रदेश,महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांशी संपर्क जोडणाऱ्या या राज्य मार्गावरील स्त्याची अवस्था अत्यंत दयनिय झाल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.तर ठीक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पावसाळ्याचे पाणी साचल्याने वाहन धारकांना खड्ड्यातील पाण्याचा अंदाज येत नसून खड्यांनमध्ये वाहणे आदळतात व वाहन धारकांना नाहक वाहनाच्या दुरूस्ती साठी भार सोसावा लागतो ब-याचदा वाहन चालक खड्डे चुकवण्याच्या नांदात अपघात होतात व दोन वाहनधारकांनमध्ये शाब्दिक चकमक ही होते.मात्र आज पर्यंत या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने काही ठिकाणी खड्यांची तात्पुरती थातूरमातूर स्वरूपात डागडुगी केली जाते व दोन-तीन दिवसात परत जैसे थे परिस्थिती या रस्त्याची होत आहे.नेहमीच रहदारीचा हा रस्ता असल्याने व शाळेच्या स्कूल बस देखील या रस्त्यावर नियमित प्रवास करीत असतात या स्कूल बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या लहान लहान विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे म्हणून इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल किनगाव यांनी शनिवार दि.२६ रोजी सकाळी १०:३० वाजता किनगाव येथे रास्तारोको केला.या रास्तारोको दरम्यान शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी रस्त्यावर उतरून महामार्गवरील खड्ड्या बाबतीत “यावल चोपडा रस्त्यावरील खड्डे बनले हाँस्पीटलचे अड्डे””देखो यावल चोपडा रस्ता हालत हो गई खस्ता””देशाने केले चंन्द्रावर यशस्वी लँन्डींग यावल चोपडा रस्त्याचे काम आहे पेंन्डींग”यासारख्या विविध घोषणांनी परीसरगजबजला होता अर्धा तास हा रस्तारोको करण्यात आला.यावेळी इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कूलचे सचिव मनीष विजयकुमार पाटील प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील व सर्व शिक्षक,शिक्षीका यांनी राष्ट्रीय महामार्गचे अभियंता चंदन गायकवाड यांना निवेदन दिले.चंदन गायकवाड यांनी रास्ता रोकोच्या ठीकाणी भेट देत विद्यार्थीच्या समस्या जाणून घेत पावसाळा संपल्यावर लगेचच या रस्त्याच्या कामाला सुरूवात होणार असल्याचे सांगीतले यावेळी
स्कूलचे सचिव मनीष विजयकुमार पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शांततेत निवेदन सादर केले याठीकाणी शांततेतसाठी यावल पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शन खाली पोलीस उपनिरिक्षक मुज्जफर खान, पोतीस नाईक नरेंद्र बागुले, सहाय्यक फौजदार असलम खान,जाकीर तडवी,उमेश महाजन, निलेश वाघ,योगेश खोंडे,गोपणीय विभाग प्रमुख सुशील घुगे,सीमा चिघळकर पो.पा.संघटनेचे जिल्हा कार्येअध्यक्ष अशोक रघुनाथ पाटील डोणगाव येथील पो.पा.उमेश पाटील किनगाव बुद्रूकचे पो.पा.सौ.रेखाताई सचिन नायदे नायगावचे पो.पा.मनोज देशमुख,सचिन नायदे यांचे सहकार्य लाभले.या रास्तारोको कार्येक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलचे शिक्षक हर्षल मोरे,योगीता बिहारी,देवयानी साळुंखे,मिलींद भालेराव,भावना चोपडे,प्रतिभा धनगर,गोपाल चित्ते,पवनकुमार महाजन, सुहास भालेराव,प्रतिक तायडे,पुजा तायडे,सोनाली कासार,प्रतिभा पाटील,बळीराम कोतवाय,शेखर पाटील,वैशाली चौधरी,योगीता सावडे,रोहित बावीस्कर,मयुरी बारी,तिलोत्तमा महाजन,सोनाली वाणी,रत्ना बाविस्कर,वैशाली बडगुजर,बाळासाहेब पाटील इ.सह स्कुलबस वाहनचालक यांचे योगदान लाभले.
या वेळी माहामार्ग अभियंता चंदन गायकवाड यांना निवेदन देतांना सचिव मनिष पाटील प्राचार्य अशोक पाटील व सर्व शिक्षक.